आमच्या घरात वरच्या मजल्यापासून ते खालपर्यंत ४५ शिड्या आहेत ज्यात वळणाच्या रुपात पाच अडथळे आहेत. अनेकदा मनात विचार येतो की हे वळणे किंवा अडथळे नसते तर किती सोपं झालं असतं.
जीवनात अडथळेही आवश्यक आहेत. जीवनात जर अडथळे किंवा गतिरोधक नसतील तर आपण अमर्याद वेगाने धावायला सुरुवात करू आणि अनेक विविध प्रकारच्या दुर्घटनांना बळी पडू. लाल सिग्नल लागल्यावर थांबणे आवश्यक आहे, पण यामुळे आपण अव्यवस्था आणि ट्रॅफिक जाम पासून वाचू शकतो. गतिरोधक आपल्या अनियंत्रित गतीला नियंत्रित करतात आणि ते आपला दुर्घटना होण्यापासून बचाव करतात. तपासणी नाका आणि विविध प्रकारच्या तपासणी एजन्सी नसत्या तर आपली असंविधानिक व अनैतिक कामे करण्याच्या शक्यता वाढल्या असत्या. कोणते ना कोणते भौतिक गतिरोधक किंवा मानसिक दबावामुळेच आपण अपेक्षित नियमांचे पालन करून चांगले नागरिक झालो आहोत. तसं पाहता आपण जीवनात अनियंत्रित होऊन सतत पळत राहिलो तर आपण किती पळू शकणार आहोत? लियो टॉल्सटॉयच्या गोष्टीतील एक प्रमुख पात्र अधिक जमीन मिळवण्याच्या नादात पूर्ण दिवस अनियंत्रित वेगाने पळू लागतो पण अखेर त्याला आपले प्राण गमवावे लागतात.
धावल्यानंतर थकवा येणं स्वाभाविक आहे. आता विश्रांती घ्यावी असे ठरवणेही गरजेचे आहे. काम करून थकल्यानंतर योग्य वेळी विश्रांती घेतली तर आयुष्यभर धावू शकतो आणि जीवनाच्या शर्यतीत खरोखर आगेकूच करू शकतो. यासाठी विश्रामरुपी गतिरोधक आवश्यक आहे. जीवनात सतत काम करत राहाल, पैसेही कमवाल पण शारीरिक स्वास्थ, मानसिक सर्तकता व भावनात्मक संतुलनाकडे लक्ष न दिल्यास सतत तणाव आणि चिंतेने ग्रासलेले असाल तर अशा कमाईचा काहीही उपयोग होणार नाही? जीवनात संतुलन राखणे गरजेचे आहे. जीवनात विविध प्रकारचे अडथळे किंवा बाधा संतुलन मिळविण्याच्या संधी प्राप्त करून देत असतात. हे अडथळे सांगत असतात की, जीवनात बाहेरील अडथळ्यांशिवाय अंतर्गत अथवा मानसिक अडथळ्यांना दूर करणे किती महत्त्वाचेआहे.

आपण आयुष्यात किती धावलो त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे की, आपण किती अडथळे पार केले. अडथळेरहित जीवनापेक्षा आव्हानयुक्त जीवन चांगलं आहे कारण आव्हानांचा स्वीकार करण्यातच जीवनाचा वास्तविक विकास शक्य आहे. आव्हांनाशिवाय आपण कोणताही नवी गोष्ट शिकू शकणार नाही किंवा विषम परिस्थितीत त्याच्याशी झगडण्याचा संकल्प किंवा साहस आपण करू शकणार नाही. अडथळे आपल्याला मागे वळून पाहण्यात आणि आत्मपरीक्षण किंवा पुर्नमूल्यांकन करण्याची संधी देत असतात.

0 टिप्पण्या