तवा पुलाव घरी बनवण्याचा खूप ठिकाणी प्रयत्न केला जातो परंतु तवा पुलाव ऐवजी वेगळ्या चवीचा मसालेभात बनतो . याला कारण यामध्ये पावभाजी मसाला घातला की झाले असा समज आहे . त्यामुळे आणि प्तिखट खाण्याच्या सवयीमुळे सगळे इनग्रेडीयंटस उलटे सुलटे वापरले जातात . एकदा या पद्धतीने तवा पुलाव बनवून बघा .
3 कप बासमती राईस उकडलेला . पाणी विरहित
½ टी स्पून आलं लसूण पेस्ट
2.5 टेबल स्पून पावभाजी मसाला
1 कांदा उभा चिरून
2 ते 3 मध्यम टोमॅटो
1 टी स्पून धणे पावडर
1 टी स्पून लाल मिरची पावडर
½ टी स्पून काश्मिरी मिरची पावडर
½ टी स्पून गरम मसाला पावडर
मीठ आवश्यकतेनुसार

½ कप ग्रीन पीज उकडलेले
¼ कप गाजर अर्धे उकडून क्यूब्ज करून
¼ कप श्रावण घेवडा किंवा बीन्स अर्धे उकडून
1 मोठा बटाटा उकडून क्यूब्ज करून
1 छोटी ढोबळी मिरची बारीक चिरून
कोथिंबीर गार्निश करण्यासाठी
1 टी स्पून जिरे
लिंबाच्या फोडी
1 टेबल स्पून तेल
बासमती राईस उकडून चाळणीत गार करायला ठेवा म्हणजे त्यात माॅईश्चर व पाणी रहाणार नाही . ज्यामुळे पुलाव सुटा सुटा होतो .
एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे घालून जिरे तडतडल्यावर आलं लसूण पेस्ट व कांदा फ्राय करून घ्या . कांदा ट्रान्सपरंट झाला की त्यात टोमॅटो ॲड करून , टोमॅटो मऊ शिजेपर्यंत परतून घ्या .
यानंतर यामध्ये उकडलेल्या भाज्या घालून चांगले परतून मिक्स करून घ्या व लाल मिरची पावडर , काश्मिरी मिरची पावडर , गरम मसाला , पावभाजी मसाला व मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून दोन मिनिटे शिजवून घ्या . नंतर झाकण काढून त्यामध्ये बासमती राईस घालून मिक्स करून मोठ्या गॅसवर दोन ते तीन मिनिटे परतून घ्यावे .
शेवटी कोथिंबीर गार्निश करून डीशमध्ये लिंबाच्या फोडी सह सर्व्ह करा .
पावभाजी किंवा तवा पुलाव बरोबर मिळणारी लसूण चटणी
10 काश्मिरी लाल मिरच्या
8 लाल मिरच्या
¼ कप लसूण
मीठ चवीप्रमाणे
½ टेबल स्पून लिंबाचा रस
1.5 टेबल स्पून तेल
मीठ
सर्व प्रथम दोन्ही प्रकारच्या मिरच्या अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवा . नंतर पाण्यातून बाहेर काढून लिंबाचा रस सोडून उरलेले सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक पेस्ट बनवून घ्या . आणि एका बाऊल मध्ये काढून ठेवा .
आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करून घ्या . तेल गरम झाल्यावर त्यात बारीक पेस्ट केलेली चटणी मिक्स करून मोठ्या गॅसवर त्यातील पाण्याची वाफ होईपर्यंत सतत हलवून घेत राहून शिजवा . पाणी निघून गेल्यावर यामध्ये लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या . ही चटणी बनण्यासाठी साधारण बारा ते पंधरा मिनिटे लागतात .
आता आपली चटणी तयार झाली आहे .
ही तवा पुलाव किंवा पावभाजी बरोबर सर्व्ह करा .
ही चटणी फ्रिजमध्ये कितीही दिवस राहू शकते .
1 टिप्पण्या